Video : आसावरीचा ख-या आयुष्यातला बबड्या आहे उत्तम शेफ , करुन दाखवले टेस्टी कुकीज

By  
on  

अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ म्हणजेच अगंबाई सासूबाई मालिकेतली आसावरी अवघ्या महाराष्ट्राची लाडकी आहे. मालिकेत जशी आसावरी सुगरण आहे, तशीच ती प्रत्यक्ष आयुष्यातसुध्दा आहे. निवेतदिता सराफ यांना विविध पदार्थ करुन पाहायला आणि त्याच्या रेसिपीज सर्व चाहत्यांशी शेअर करायला खुप आवडतं. त्यांचं निवेदिता सराफ रेसिपीज नावाचं एक युट्यूब चॅनेल देखील आहे. त्याद्वारे त्या विविध टेस्टी रेसिपीज चाहत्यांना करुन दाखवतात.

निवेदिता यांच्या प्रमाणेच  त्यांचा लेक अनिकेत सराफसुध्दा एक उत्तम शेफ आहे. आंतरराष्ट्रीय पदार्थ बनवण्यात अनिकेतचा हातखंडा आहे. निवेदिता सराफ रेसिपीजसाठी ख्रिसमस व न्यू ईयर सेलिब्रेशननिमित्ताने त्याने खास मस्त जिंजर ब्रेड कुकीज करुन दाखवल्या आहेत. 

 

 

 

 

अनिकेतच्या रेसिपीचा व्हिडीओ शेअर करताना निवेदिता सराफ यांना प्रचंड आनंद व अभिमान वाटत होता. त्या म्हणतात, "मुलं नेहमी आईकडे हट्ट करतात, की आई मला हे खायला हवं ते हवं..पण मी याबाबतीत खुपच लकी आहे. कारण, मीच नेहमी अनिकेतला त्याचे स्पेशल पदार्थ मला करुन द्यायला सांगते. त्याच्या हातची थाई करी, जिंजर ब्रेड कुकीज मला प्रचंड आवडतात."

निवेदिता सराफ यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Recommended

Loading...
Share