By  
on  

"विश्वसनीय नातं म्हणजे मैत्री" म्हणत मानसी नाईकने शेयर केले ब्राईड्समेडसोबतचे हे फोटो

अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना मानसी नाईक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तेव्हा लग्नाआधीच्या विविध कार्यक्रमाची तयारी सध्या पाहायला मिळतेय. सध्या मानसी तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी आणि फोटोशुटची मजा लुटत आहे. यात अभिनेत्री दिपाली सय्यद आणि सीमा कदम या तिच्या खास मैत्रिणी तिच्या ब्राईड्समेड आहेत. 

नुकतच मानसीने तिच्या या खास मैत्रिणींसोबत फोटोशुट केलं आहे. सोशल मिडीयावर मानसीने हे फोटो शेयर केले आहेत. मानसी या पोस्टमध्ये लिहीते की, "कोणीतरी एकदा विचारलं मित्र आपला कसा असावा मी म्हणालो आरशासारखा प्रमाणित गुण दोष दोन्ही दाखवणारा. मित्राचा राग आला तरी त्यांना सोडता येत नाही , कारण दुःखात असो किंवा सुखात  ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही. चुका होतील आमच्या मैत्रीत पण "विश्वासघात" कधीच होणार नाही. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील कितीही दूर जरी गेलो तरी मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच उद्या राहील. अडचणीच्या काळात एकट न सोडता आधाराचा हात खांद्यावर ठेवून डोळे झाकून निभावणार विश्वसनीय नातं म्हणजे मैत्री."

 

मैत्रीविषयी ही खास पोस्ट शेयर करत मानसीने हे खास फोटो पोस्ट केले आहेत. याशिवाय मानसीने या ब्राईड्समेडसोबत विविध व्हिडीओही शुट केले आहेत. 

येत्या 19 जानेवारी रोजी मानसी आणि प्रदीप खरेरा पुण्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. मागील वर्षी 2020 मध्ये मानसीने तिच्या वाढदिवसाला प्रदीपसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. 2020 मध्ये दोघांनी साखरपुडाही केला आहे. प्रदीप हा प्रसिद्ध इंटरनॅशनल बॉक्सर आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive