By  
on  

मालिकेसाठी स्वत:ला पोस्टरवर पाहून आनंदी झाली अभिनेत्री हेमांगी कवी, हे आहे कारण...

पोस्टरवर झळकण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. अनेक कलाकारांनी हे स्वप्न पाहिलं, काहिंनी ते पूर्णही केलं. अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या आयुष्यातील असाच एक आनंद सोशल मिडीयावर शेयर केला आहे. 'तेरी लाडली मैं' ही नवी हिंदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत हेमांगीची मुख्य भूमिका आहे. याच मालिकेच्या निमित्ताने हेमांगी विविध पोस्टरवर झळकतेय. हाच आनंद हेमांगीने पोस्ट करून शेयर केलाय.

याविषयी सांगताना हेमांगीने एका फॅन अकाउंटवर वादळवाट या मालिकेचा फोटो शेयर केला असल्याचा उल्लेख केला. याच मालिकेतून हेमांगीची मालिका विश्वात सुरुवात झाली होती. मात्र विविध नाटक, सिनेमांसाठी हेमांगी पोस्टरवर झळकली आहे. मात्र इतक्या वर्षात मालिकेसाठी पोस्टरवर झळकण्याची हेमांगीची ही पहिलीच वेळ. 

हेमांगी या पोस्टमध्ये लिहीते की, "रसिक हो, काल इन्स्टावर वादळवाट फॅन अकाउंट ने माझे हे फोटो शेयर केले! किती चपडगंजू दिसतेय मी (तसा आता ही फार फरक पडला नाहीये) 
असो, तर...२००६ साली वादळवाट मध्ये श्रावणी चौधरी ची भूमिका करून मालिका विश्वात पाऊल ठेवलं! त्याआधी केवळ रंगभूमीवर काम केलं होतं. रिप्लेसमेंट (आधीच्या कलाकाराच्या जागेवर मिळालेलं काम) ने केलेली सुरवात! कॅमेरा समोर चाचपडत धडपडत सुरु झालेला प्रवास! २०२१, काल माझ्या नवीन मालिकेचा शुभारंभ झाला, यात उर्मिला म्हणून तुमच्या समोर येणार आहे. दरम्यान बऱ्याच मालिका केल्या पण स्वतःला असं मालिकेसाठी पोस्टर वर पाहून फार बरं वाटतंय! या आधी नाटकांसाठी, चित्रपटांसाठी पोस्टरवर यायचं भाग्य मला लाभलं पण हे असं खास मालिकेसाठी पोस्टर वर यायची माझी पहिलीच वेळ...स्वतःला पोस्टर वर पाहताना मज्जाच आली राव! एका कलाकारासाठी ही एक मोठी अचिव्हमेंटच! हा असा रिप्लेसमेंट ते पोस्टरवर १५ वर्षांचा प्रवास घरच्यांच्या, मित्र मैत्रिणींच्या, हितचिंतकांच्या आणि विशेष करून तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे झाला... नाहीतर इतकी वर्ष कुणी मला सहन केलं असतं? आणि आता सहन करतच आहात म्हटल्यावर या मालिकेत ही कराल अशी आशा करते!"

यात हेमांगीने रिप्लेसमेंट ते आता पोस्टरवर झळकण्याचा 15 वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख केला आहे. हा आनंद शेयर करण्यासाठी हेमांगीने पोस्टरसोबतचा सेल्फि फोटो पोस्ट केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive