By  
on  

पाहा Photos : या लुकमध्ये अभिनेत्री पूजा सावंत दिसतेय गॉर्जियस

अभिनेत्री पूजा सावंतचे विविध सुंदर फोटोशूट सोशल मिडीयावर लक्षवेधी ठरतात. 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या डान्स रिएलिटी शोमध्ये पूजा परिक्षकाची धुरा सांभाळतेय. या कार्यक्रमासाठी पूजा एकापेक्षा एक सुंदर आउटफिटमध्ये पाहायला मिळते.

पूजा ही मराठी सिनेसृष्टीतील फॅशन आयकॉनपैकी एक आहे. त्याचं काही श्रेय पूजाच्या डिझायनर्स, स्टाईलिस्टलाही जातं. मात्र त्या सुंदर आउटफिटसाठी फिट लुक आणि तो लुक कॅरी करणं हे पूजा उत्तररित्या करते. 

पूजाने नुकतेच काही खास फोटो शेयर केले आहेत. यात हिरव्या रंगाचा स्लिट लाँग गाऊन पूजाने परिधान केला आहे. या लुकमधील सुंदर फोटो पूजाने शेयर केले आहेत. 

छायाचित्रकार श्रुती बागवेने पूजाचे हे सुंदर फोटो क्लिक केले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive