By  
on  

आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी मानसी नाईकला या मैत्रिणीकडून मिळाल्या खास शुभेच्छा

येत्या 19 जानेवारी रोजी अभिनेत्री मानसी नाईक विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नाची तयारी सुरु असतानाच मानसी तिच्या मैत्रिणींसोबत म्हणजेच ब्राईड्समेड्ससोबत लग्नाआधीचे दिवस एन्जॉय करतेय. नुकतच मानसीने ब्राईड्समेड दिपाली सय्यद आणि सीमा कदम यांच्यासोबत खास फोटोशुट केलं आहे. 

नुकतच दिपालीनेही मानसीसोबतचे फोटो शेयर केले आहेत. हे फोटो शेयर करत दिपाली आपल्या मैत्रिणीला नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दिपाली लिहीते की,  "प्रिय मनू, आपल्या आयुष्यातील खरंतर इतक्या वर्षाचा प्रवास तुझ्यासोबत किती सहजपणे निघून गेला कळलंच नाही. आज संसारात वावरताना मैत्रीण, आई, मुलगी, बहिण अशा कित्येक नात्यात वावरताना आयुष्यातल्या चढउतारात, सुख दुःखात एकमेकांच्या मागे खंबीरपणे उभ राहून एकमेकांना साथ दिली ! आपली मैत्री म्हणजे आयुष्यातील अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा ठेवा. मनू लवकरच तुझ्या आयुष्याची नवीन सुरवात होत आहे ... मी तुम्हा दोघांनाही सुखी संसारासाठी शुभेच्छा देते. शेवटी एकच लिहावंसं वाटतं. कायम आनंदी रहा मनू दिल्या घरी तू सुखी राहा."

तेव्हा या खास मैत्रिणीकडून मानसीला शुभेच्छा मिळाल्या आहेत. पुण्यात मानसी आणि प्रदीप खरेरा यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive