By  
on  

पाहा Video : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेचं शीर्षक गीत

या नव्या वर्षात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंज करण्यासाठी भेटीला आल्या आहेत. यातच येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेत सासू सूनेची नात्यातील गोडवा दाखवणारी ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

या मालिकेचं शीर्षक गीत मालिका पाहता दिसत असलं तरी ते सोशल मिडीयावर नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे. "यशोदा हवी गं गोकुळाला तशीच ये तू नांदायला" हे या गाण्याचे बोल आहेत. या शीर्षक गाण्यात मालिकेतील मुख्य नायिका नृत्य सादर करताना दिसत आहे.

 

 या मालिकेत अभिनेत्री अन्विता फलटणकर सूनेच्या भूमिकेत असून अभिनेत्री शुभांगी गोखले सासूच्या भूमिकेत आहेत. अभिनेता शाल्व किंजवडेकर नायकाची भूमिका साकारतोय. तर अदिती सारंगधर, दीप्ती केतकर हे कलाकार देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मालिकेचे दिग्दर्शन अजय मयेकर करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive