By  
on  

संतोष जुवेकरचा पहिला इंटरनॅशनल सिनेमा, झळकणार सैनिकाच्या भूमिकेत

अभिनेता संतोष जुवेकर सध्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रोजक्टच्या तयारीत व्यस्त आहे. एप्रिल महिन्यात संतोष जुवेकर एका जर्मन फिल्ममध्ये काम करणार आहे. ह्या फिल्मच्या वर्कशॉप्समध्ये सध्या व्यस्त असलेल्या संतोषचे हे पहिले इंटरनॅशनल प्रोजेक्ट असणार आहे.

सूत्रांच्या माहितीनूसार, ह्या जर्मन फिल्मचे नाव डिसोनन्स असे असून ही सायन्स फिक्शन फिल्म आहे. ह्यात संतोष जुवेकर पिटर ह्या आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. ह्या भूमिकेसाठी संतोषने गेले काही महिने आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली. योग्य आहार आणि जिम ट्रेनिंगव्दारे त्याने आर्मी ऑफिसरसारखा फिटनेस मेन्टेन केला. त्याचप्रमाणे त्यांच्या फिजीकल अपिअरन्स आणि वागण्या-बोलण्याच्या पध्दतींचाही बारकाईने अभ्यास केला. सध्या एका जर्मन शिक्षकाकडून तो जर्मन भाषेचे प्रशिक्षण घेत आहे.

ह्याविषयी संतोष जुवेकरला विचारल्यावर तो म्हणतो, “आर्मीत जवानांना शारीरिक शिक्षणासोबतच मानसिक शिक्षणही दिले जाते. त्यांच्या मेन्टल फिटनेसची परीक्षा घेताना त्यांच्यासोबत अनेक माइंड गेमही खेळले जातात. त्यांना मानसिकदृष्ट्याही सक्षम करण्यासाठी मेन्टली थर्ड डिग्री ट्रेनिंग देण्यात येते. ह्यावरच हा सिनेमा आधारित आहे. पिटर ह्या जर्मन आर्मी अधिका-याच्या भूमिकेत मी साजेसा वाटावा ह्यासाठी मी पूर्ण तयारी केली आहे.”

संतोष पूढे सांगतो, “फिल्ममेकर्सना ही फिल्म येत्या काही दिवसांमध्येच सुरू होणा-या एका जर्मन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाठवायची आहे. सिनेमाचा विषय खूप वेगळा आहे. अशा विषयावरचं एखादं आंतराष्ट्रीय प्रोजेक्ट करायला मिळावं, अशी प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असते. म्हणूनच सिनेमाला योग्य न्याय देण्यासाठी मी भूमिकेवर कसून मेहनत करतोय. ह्यातला सर्वात कठीण भाग आहे, तो म्हणजे भाषा. जर्मन भाषा आणि त्याचे उच्चारण अस्खलित व्हावे ह्यासाठी मी सध्या ट्युटरकडून ट्रेनिंग घेत आहे.”

Author

Recommended

PeepingMoon Exclusive