By  
on  

सिद्धार्थ आणि मितालीच्या केळवणासाठी पाटलांच्या घरचं जेवण

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही गोड जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे लग्नाची तयारी सुरु होत असतानाच दोघाचे केळवण जेवणाचे कार्यक्रम सुरु आहेत. यात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आणि सिद्धार्थ - मितालीच्या मित्रमैत्रिणींनी त्यांच्यासाठी केळवणाचा कार्यक्रम ठेवले होते. 

सिद्धार्थ - मिताली सध्या या केळवण कार्यक्रमाचा आनंद लुटत आहेत. त्यातच अभिनेता हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिति जोग यांनी देखील सिद्धार्थ-मितालीसाठी केळवण जेवणाचे आयोजन केले होते. यावेळी खास जेवणाचा बेत केला होता. सिद्धार्थने नुकतच पोस्ट करून या केळवणाचे फोटो शेयर केले आहेत.

 

सिद्धार्थ त्याच्या पोस्टमध्ये लिहीतो की, "पाटलांच्या घरचं जेवण काही औरच. खूप टिप्स आणि गायडन्स ने भरलेलं केळवण. खूप खरं आणि खूप जास्त प्रेम." लवकरच दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. तेव्हा दोघांच्या लग्नाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive