By  
on  

पाहा Video : अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या लग्नाचा हा व्हिडीओ आला समोर, विवाहसोहळ्यातील खास क्षण

अभिनेत्री अभिज्ञा भावेचं नुकतच लग्न पार पडलं. मेहुल पैसोबत तिने लगीनगाठ बांधली. नुकत्याच पार पडलेल्या या विवाहसोहळ्यासाठी अनेक पाहुण्यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होते. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार या लग्नसोहळ्यासाठी हजर होते. 

 

अभिज्ञा आणि मेहुलच्या या लग्नसोहळ्याचा खास व्हिडीओ सोशल मिडीयावर पाहायला मिळतोय. या व्हिडीओत अभिज्ञा-मेहुलच्या लग्नसोहळ्याचे खास क्षण पाहायला मिळत आहेत. अभिज्ञाने देखील त्यांच्या लग्नसोहळ्याचे हे खास क्षण सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. लग्नाच्या विधीसाठी अभिज्ञाने जांभळ्या रंगाची साडी आणि मेहुलने जांभळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. 

 

या विवाहसोहळ्याला अभिनेत्री तेजस्विनी पंडित, रेश्मा शिंदे, गायत्री दातार, सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, श्रेया बुगडे, नम्रता संभेराव या कलाकारांसह अनेक कलाकार उपस्थित होते. अभिज्ञाच्या या लग्नसोहळ्याचे फोटोदेखील चर्चेत आले होते. आणि आता हा लग्नाचा व्हिडीओही सगळ्यांचं लक्ष वेधतोय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive