पाहा Photos : आसावरी आणि अभिजीत राजे यांची पहिली एकत्र संक्रांत

By  
on  

मकर संक्रांतिच्या निमित्ताने अनेक मालिकांमध्ये संक्रांत स्पेशल एपिसोड पाहायला मिळत आहेत. 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतही संक्रातिचा स्पेशल भाग चित्रीत करण्यात आला आहे. यानिमित्ताने आसावरी आणि अभिजीत राजे यांची पहिली संक्रांत साजरी होणार आहे. त्यासाठी खास चित्रीकरण करण्यात आलं.

यावेळी हलव्याचे दागिने घालून नटलेली आसावरी ह्या खास भागात पाहायला मिळणार आहे. त्यातच शुभ्रा ही लेडीज डे आऊट साठी महिलांना एकत्र आणून खास कार्यक्रम ठरवते. मात्र या वेगळ्या रुपात आलेल्या आसावरीला पाहुन अभिजीत अवाक होतात. तर सरप्राईज म्हणून ते तिच्यासाठी बाईकही घेऊन येतात. 

तर दुसरीकडे चाळीत पतंग उडवण्याची स्पर्धा ही रंगलेली असते. यात सगळे उत्साहात सहभागी होताना दिसतात. यातच मनानं तरुण असलेले अभिजीत हे त्यांची पतंगबाजी दाखवतात. सोहमही या सगळ्या कार्यक्रमात सहभागी होतो. सोहम हळूच फॅमिली पोटोतून काढता पाय घेतो, पण शुभ्रा त्याला थांबवते.

तो फोटो पाहुन आसावरी नाराज होत नाही हे बघून सोहमला बरं वाटतं. तर शुभ्राने ठरवलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी सोहम शुभ्राला आईसोबत सण साजरा करायला सांगतो. तेव्हा आसावरी आणि अभिजीतची पहिली संक्रांत त्यात सोहमचा सहभाग पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लवकरच हा एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळेल.


 

Recommended

Loading...
Share