पाहा Photos :मानसी नाईकचा होणारा पति प्रदीपसाठी खास मेसेज, म्हणते "मी तुझ्यासाठी कधीपासून तयार आहे"

By  
on  

सोशल मिडीयावर थ्रोबॅक फोटो शेयर करण्याचा जणू ट्रेंडच आहे असं म्हणावं लागेल. सेलिब्रिटी हे अनेकदा त्यांचे जुने फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करताना दिसतात. अभिनेत्री मानसी नाईकनेही तिचं जुनं फोटोशुट सोशल मिडीयावर शेयर केलं आहे.

या फोटोशुटमध्ये मानसी नाईकने दोन लुक केले आहेत. एका लुकमध्ये वेस्टर्न आउटफिट तर दुसऱ्या लुकमध्ये मानसी दुल्हन लुकमध्ये दिसतेय. हे फोटो शेयर करून मानसीने या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. याशिवाय लवकरच लग्नबंधनात अडकणारी मानसी या पोस्टमध्ये तिचा होणारा पति प्रदीपसाठी खास मेसेज लिहीताना दिसतेय. ती लिहीते की, "बघीतलं मी तुझ्यासाठी कधीपासून तयार आहे."

 

लवकरच मानसी ही प्रदीप खरेरासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या 19 जानेवारी रोजी पुण्यात दोघांचा विवाह संपन्न होणार आहे. मागील वर्षी मानसी आणि प्रदीपने साखरपुडा देखील केला होता. मानसी सध्या तिच्या लग्नाच्या तयारीत आहे. नुकतच तिने ब्राईड्समेड फोटोशुट देखील केलं आहे. 

 

 

Recommended

Loading...
Share