पाहा Photos : या कपलच्या लग्नाची उत्सुकता, अभिज्ञा भावेच्या लग्नात यांनी एकत्र लावली हजेरी

By  
on  

अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या लग्नात अनेक पाहुण्यांनी हजेरी लावली होती. यात मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारही होते. यात काही गोड कपलही या लग्नसोहळ्यात सहभागी झाले. अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेनानेही या सोहळ्याला एकत्र हजेरी लावली होती.

सोशल मिडीयावर ईशा आणि ऋषीचे अनेक फोटो चर्चेत असतात. त्यातच अभिज्ञाच्या लग्नातील त्यांचे काही फोटो चर्चेत आले आहेत. फोटोग्राफर राहुल राऊळने दोघांचे हे सुंदर फोटो क्लिक केले आहेत.

या फोटोंमध्ये दोघं कपल गोल्स देताना दिसत आहेत. निळ्या आणि आकाशी रंगाचं कॉम्बिनेशन असलेलं आउटफिट दोघांनी परिधान केले आहे. 

गेल्या काही वर्षांपासून ईशा आणि ऋषी एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मिडीयावरही दोघांचे एकत्र फोटो पाहायला मिळतात. मात्र दोघं विवाहबंधनात कधी अडकतील याची अनेकांना उत्सुकता असेलच. तेव्हा हे गोड कपल लगीनगाठ कधी बांधतील हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Recommended

Loading...
Share