पाहा Photos : संक्रातीच्या निमित्ताने शेयर केलेल्या अमृता खानविलकरच्या या फोटोंनी वेधलं सगळ्यांचं लक्ष

By  
on  

मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोशल मिडीयावर या सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. अनेक कलाकार त्यांचे काळ्या रंगातील खास पेहरावातील फोटो शेयर करून मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत आहेत. यातच अनेक अभिनेत्रींनी काळ्या साड्या नेसून नटून थटून फोटो क्लिक केले आहेत. 

अभिनेत्री अमृता खानविलकरनेही खास काळ्या रंगाच्या साडीतील फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

काळ्या रंगाच्या साडीवर मोकळे केस आणि गळ्यात नेकपीस असा हा लुक आहे. 

अमृताच्या या लुकला तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे. सोशल मिडीयावर हे फोटो पसंत केले जात आहेत. हे फोटो शेयर करून अमृताने चाहत्यांना आणि फॉलोअर्सना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Recommended

Loading...
Share