By  
on  

पाहा Photos : मैत्रिणीच्या लग्नात अशा सुंदर नटल्या या अभिनेत्री

अभिनेत्री अभिज्ञा भावे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. मेहुल पै सोबत अभिज्ञाचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला अभिज्ञाचे मित्रमंडळीही हजर होते. यात मनोरंजन विश्वातील कलाकारही उपस्थित होते. अभिज्ञाच्या खास मैत्रिणी रेश्मा शिंदे आणि अनुजा साठे यांनी देखील हजेरी लावली होती.रेश्मा आणि अनुजा या त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नात खास साडी लुकमध्ये दिसल्या. रेश्माने सोशल मिडीयावर या विवाहसोहळ्याचे खास क्षण शेयर केले आहेत.

गुलाबी, जांभळ्या रंगाच्या सुंदर साड्यांमधील या मैत्रिणींचे फोटो खास लक्ष वेधत आहेत. 

आपल्या लाडक्य नवराईसाठी या मैत्रिणी उत्साहात दिसत होत्या. 

'लगोरी' या मालिकेत या रेश्मा शिंदे, अनुजा साठे, अभिज्ञा भावे या एकत्र झळकल्या होत्या. 'रंग माझा वेगळा' या मालिकेतही अभिज्ञाने रेश्मासोबत काम केलं आहे. तेव्हा या ऑनस्क्रिन मैत्रिणींमध्ये ऑफस्क्रिन किती घट्ट मैत्री आहे हे या लग्नसोहळ्यात पाहायला मिळालं आहे. यावेळी अनुजा साठेचा पति अभिनेता सौरभ गोखले देखील हजर होता. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive