'आई कुठे काय करते' या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच टीआरपीच्या रेसमध्ये ही मालिका अव्वल असते. यासोबत हाच विषय आणि हीच कथा असलेली हिंदी मालिकाही आहे. अनुपमा असं या हिंदी मालिकेचं नाव आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर आईच्या भूमिकेत आहे. तर अनुपमा मालिकेत रुपाली गांगुली आईच्या भूमिकेत आहे.
या मराठी मालिकेत जी पात्रं आहेत तशीच पात्रं हिंदीतही आहे. नुकतच या हिंदी आणि मराठी अशा दोन्ही मालिकांमधील कलाकारांचं खास गेटटुगेदर झालं. यावेळी हे कलाकारांना भेटले. शिवाय छान फोटोही क्लिक केले.
यशचं पात्र साकारणाऱ्या अभिनेता अभिषेक देशमुखने या खास भेटीचे फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. हिंदी मालिकेत यशच्या पात्राचं नाव समर असं आहे. जे साकारतोय अभिनेता पारस, तेव्हा अभिषेकने समर म्हणजेच पारसचीही यावेळी भेट घेतली आहे.
यावेळी दोन्ही मालिकांचे कलाकार उपस्थित होते. आणि या कलाकारांची खास ग्रेटभेट यानिमित्ताने झाली आहे. या दोन्ही मालिकांचा विषय हा आईच्या आयुष्याभोवती फिरणारा आहे. आणि दोन्ही मालिका मराठी आणि हिंदी भाषेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.