By  
on  

पाहा Video : असा रंगला मानसी नाईकचा मेहंदी, संगीत सोहळा

अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मात्र त्याआधी मानसीच्या लग्नाच्या विविध कार्यक्रम सोहळे सध्या पार पडत आहेत. नुकताच मानसीचा मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी मानसी सुंदर नटलेली दिसली. हिरव्या रंगाच्या लेहंग्यात मानसीचं सौंदर्य खुलून दिसत होतं. 

 

या मेहंदी, संगीत सोहळ्याला मानसीची खास मैत्रीण अभिनेत्री दिपाली सय्यद देखील हजर होती. दिपालीने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. हातावर मेहंदी चढवून मानसीच्या मैत्रीणीही या संगीत सोहळ्यात डान्स करत होत्या.

 

मानसीनेही तिचा मेहंदी, संगीत सोहळ्याचा चांगलाच आनंद लुटला. मानसीचेही खास परफॉर्मन्स यावेळी पाहायला मिळाले. मानसीचा होणार पति प्रदीप खरेराही नंतर या सोहळ्यात पोहोचला. मानसी आणि प्रदीपनेही यावेळी धमाल डान्स केला. मानसीचा परिवार आणि मित्रमंडळी या सोहळ्यात मनसोक्त नाचताना दिसली. 

 

नुकताच मानसी आणि प्रदीपचा हळदी समारंभ पार पडला असून आता लग्नाची तयारी सुरु आहे. लवकरच मानसी नाईक आता मिसेस खरेरा होणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive