By  
on  

पाहा Video : भारतीय संघाच्या विजयाचं कलाकारांनी असं केलं सेलिब्रेशन

आज ब्रिस्बेन कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाने एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. सोशल मिडीयावर या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं जातय. अनेकांनी या विजयासाठी भारतीय संघाचं कौतुक केलं आहे.

अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मिडीयावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता सुमीत राघवननं एक व्हिडीओ पोस्ट करून त्याच्या भावना व्यक्त केल्या. सुमीतचा आनंद गगनात मावेनासा झालेला या व्हिडीओत पाहायला मिळतोय.

 

तर प्रसिद्ध शास्त्रिय गायक राहुल देशपांडेची मुलगी रेणुका या विजयाने आनंदी झाल्याचं पाहायला मिळतय. राहुलने पोस्ट केलेल्या व्हिडीओत रेणुका भारतीय संघ जिंकल्याचा आनंद भारताचा ध्वज हातात घेऊन व्यक्त करताना दिसतेय. 

 

यासह अनेक सेलिब्रिटींनी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर भारतीय संघाचं कौतुक करत आनंद व्यक्त केला आहे. मराठीसह अनेक बॉलिवुड कलाकारांनी सोशल मिडीयावर त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive