By  
on  

अक्षय कुमारच्या मराठी शिक्षिकेला आवडला ‘चुंबक’; लावली विशेष स्क्रिनिंगला हजेरी

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार प्रस्तुत ‘चुंबक’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या सिनेमाकडे आपण चुंबकासारखे आकर्षित झाल्याचे अक्षयने यापूर्वी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगितले होते. हा सिनेमा त्याला प्रचंड भावला आहे, हेसुद्दा त्याने शेअर केले होते. महत्त्वाचं म्हणजे अक्षयला शाळेत मराठी शिकविणा-या शिक्षिकेने या सिनेमाच्या विशेष स्क्रिनिंगला हजेरी लावली होती आणि त्यांना हा सिनेमा खुप आवडला.

‘चुंबक’च्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी अक्षयला विचारण्यात आले होते, की या सिनेमाच्या विशेष स्क्रिनिंगमध्ये तुमच्या मराठी शिक्षिकेनेसुध्दा हजेरी लावली होती. याचे काही खास कारण आहे का, तेव्हा तो म्हणाला, “होय. माझ्या मराठी शिक्षिकेने ‘चुंबक’ पाहिला. त्यांना हा सिनेमा खुप आवडला आहे. मी आज जो काही मराठी बोलतोय त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या शिक्षिकेलाच जातं.”

‘72 मैल –एक प्रवास’ सिनेमानंतर अक्षय ‘चुंबक’सह मराठी प्रेक्षकांसमोर एक हद्यस्पर्शी आणि हटके विषय सादर करत आहे. गीतकार-संगीतकार आणि अभिनेता स्वानंद किरकिरेची यात प्रमुख भूमिकेत आहे.

एक 15 वर्षीय गरीब मुलगा आणि एक मध्यवयीन गतिमंद गृहस्थ यांच्या जीवनाचा वेध घेणारी हद्यस्पर्शी गोष्ट म्हणजे चुंबक. प्रसन्न ठोंबरे ही व्यक्तिरेखा स्वानंद किरकिरे यांनी साकारली आहे. तर ‘डिस्को’ ही दुसरी महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा संग्राम देसाई या कुमारवयीन युवकाने साकारून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. संदीप मोदी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

अक्षय कुमारची प्रस्तुती असलेला ‘चुंबक’ संपूर्ण महाराष्ट्रात 27 जुलै 2018 रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive