By  
on  

पाहा Photos : 'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रजासत्ताक दिन विशेष एपिसोड

 'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. फक्त मनोरंजनच नाही तर इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व या कार्यक्रमाच्या मंचावर येतात. प्रजासत्ताक दिन विशेष भागातही काही खास पाहुण्यांनी हजेरी लावली होती. 

नुकतच चला हवा येऊ द्याच्या प्रजासत्ताक दिन विशेष भागाचं चित्रीकरण करण्यात आलं. यावेळी प्रजासत्ताक दिन विशेष आठवडा साजरा करण्यात आला. या निमित्ताने या मंचावर आय पी एस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील, ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम, डॉ. तात्याराव लहाने आणि ग्लोबल पुरस्कारप्राप्त रणजित डिसले गुरजी या दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. 

यावेळी दिग्गज मंडळी त्यांच्या परिवारासोबत 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर हजर होती. तेव्हा या कार्यक्रमातील विनोदवीरांनी या मंडळींना चांगलच हसवलं असेल यात शंका नाही.

विविध क्षेत्रातील हे दिग्गज त्यांचे अनुभव व्यक्त करताना दिसतील. येत्या 25 ते 27 जानेवारी दरम्यान हे खास भाग चला हवा येऊ द्या कार्यक्रमात दाखवण्यात येतील. 


 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive