By  
on  

पाहा Video : 'सांग तू आहेस का' मालिकेतील ही अभिनेत्री आहे उत्तम नृत्यांगना

'सांग तू आहेस का' ही मालिका विविध वळणावर एक वेगळाच थरार घेऊन येताना पाहायला मिळतेय. अभिनेत्री सानिया चौधरी ही या मालिकेत वैभवीची व्यक्तिरेखा साकारतेय. वैभवी ही स्वराजची पत्नि असून तिच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा स्वराजच्या आसपास भटकताना दिसतो. 

या मालिकेचा थरार प्रेक्षकांना थक्क करतोय. शिवाय वैभवीच्या रुपात दिसणाऱ्या सानियाचंही कौतुक होताना दिसतय. यातच सोशल मिडीयावर सानिया तिचे व्हिडीओ, फोटो पोस्ट करताना दिसते. सानियाने नुकताच तिचा एक डान्स व्हिडीओ शेयर केला आहे. 

 

मालिकेच्या सेटवर ब्रेकटाईममध्ये सानिया तिची नृत्याची आवड कशी जोपासतेय ते यातून पाहायला मिळतय. सानिया ही एक उत्तम कथक डान्सर आहे. अभिनेत्री म्हणून काम करत असतानाही सानियाने नृत्याची आवड कायम जपली असल्याचं यातून पाहायला मिळतय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive