पाहा Video : या गाण्यात अभिनेते ऋषि कपूर यांच्यासोबत झळकली होती ही अभिनेत्री, शेयर केली आठवण

By  
on  

अभिनेत्री अश्विनी भावे यांनी मराठीसह अनेक गाजलेल्या हिंदी सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. अभिनेता ऋषि कपूरसोबतही त्या झळकल्या होत्या. मोहब्बत की आरजू या सिनेमात त्यांनी एक खास गाणं केलं होतं. याच गाण्याची आठवण अश्विनी भावे यांनी नुकतीच सोशल मिडीयावर शेयर केली आहे.

काही जुन्या आठवणी या आनंद देतात. अशीच एक आठवण अश्विनी भावे यांनी शेयर केली मोहब्बत की आरजू या सिनेमात त्या अभिनेते ऋषि कपूर यांच्यासोबत झळकल्या होत्या. या सिनेमातील पायल उतार दुंगी हे गाणं अश्विनी भावे आणि ऋषि कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. याच गाण्याची खास झलक अश्विनी यांनी चाहत्यांसाठी शेयर केली आहे. 

 

या गाण्यात अश्विनी यांनी लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या गाण्यातील त्यांच्या खास परफॉर्मन्स ने त्यांनी लक्ष वेधलं होतं. 1994 मध्ये आलेल्या या सिनेमाची आठवण सांगताना अश्विनी लिहीतात की, "मोहब्बत की आरजू या माझ्या 1994 मध्ये आलेली ऋषि कपूर यांच्यासोबतच्या फिल्मच्या आठवणी जागवताना. या सिनेमातील प्रेमगीताची झलक."

या पोस्टमध्ये अश्विनी भावे यांनी या गाण्याची छोटीशी झलक शेयर केली आहे.

Recommended

Loading...
Share