स्टार प्रवाहवरील लोकप्रप्रय मालिका ‘ललित २०५’ आणि ‘छत्रीवाली’मध्ये पाडव्याचा गोडवा पाहायला मिळणार आहे. सहकुटुंब गुढी उभारत या दोन्ही मालिकेतील कलाकारांनी मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. ‘ललित २०५’च्या राजाध्यक्ष कुटुंबासाठी हा सण आणि येणारं नवं वर्षं खऱ्या अर्थाने निर्णायक ठरणार आहे. आजवर नील, भैरवी आणि सुमित्रा आजीने मिळून प्रत्येक संकटाचा सामना केलाय.
आता मात्र संपुर्ण राजाध्यक्ष कुटुंब एकत्र आलंय, त्यामुळे आनंदाचे आणि सुखाचे क्ष्ण पुन्हा परत येतील याचा विश्वास संपुर्ण कुटुंबाला आहे. या निमित्ताने राजाध्यक्षांच्या सुनांनी खास गोडाचा बेतही केलाय. त्यामुळे शूटिंग च्या निमित्ताने सेटवर खरंखुरं सेलिब्रेशन करण्यात आलं.
छत्रीवाली’ मालिकेतही उत्साहात गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात आला. विक्रम आणि मधुरा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्यामुळे यंदा गुढी उभारण्याचा मान गायकवाड कुटुंबाने मधुराला दिला. पारंपरिक पद्धतीने गुढीची पुजा करत मधुराने या सणाचा गोडवा वाढवला.
या मालिकेत विक्रमची भूमिका साकारणाऱ्या संकेत पाठकने या निमित्ताने गुढीपाडव्याची एक खास आठवण शेअर केली. ‘मी मुळचा नाशिकचा आहे. माझ्या घरी दरवर्षी जल्लोषात गुढी उभारली जाते. लहानपणी मी माझी स्वत:ची वेगळी गुढी उभारायचो. गुढीचे छोटे दागिने, छोटी साडी याचं विशेष कौतुक वाटायचं. आता शूटिंग मुळे घरी गुढी उभारण्यासाठी जाणं शक्य होत नाही. पण सेटवरच्या या सेलिब्रेशनमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याची भावना संकेतने व्यक्त केली.’ ‘ललित २०५’ आणि ‘छत्रीवाली’ मालिकेतलं हे मराठमोळं सेलिब्रेशन नक्की पाहा. ‘ललित २०५’ सायंकाळी ६ वाजता आणि ‘छत्रीवाली’ मालिकेचा विशेष भाग रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.