सिद्धार्थ - मितालीच्या गोंधळ विधी कार्यक्रमाला धावत पळत पोहोचली ही अभिनेत्री

By  
on  

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले. पुण्यात दोघांचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला अनेक कलाकार मंडळींना हजेरी लावली होती. मेहंदी, संगीत, हळद असे विविध कार्यक्रमही पार पडले होते. नुकताच सिद्धार्थ - मितालीचा गोंधळ विधी पार पडला. यासाठीही सिद्धार्थ - मितालीचा मित्रपरिवार उपस्थित होता.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दोघांच्या लग्नात पोहोचणं शक्य नसल्याने ती गोंधळ विधीला पोहोचली होती. मात्र यासाठी वेगळाच गोंधळ झाल्याचं सोनाली तिच्या सोशल मिडीया पोस्टमध्ये सांगतेय. सोनालीने सिद्धार्थ-मिताली सोबतचा फोटो शेयर केला आहे. सोनाली लिहीते की, "गोंधळात गोंधळ झाला पार, सॉरी लग्नाला येऊ शकले नाही. तरीही धावत पळत आले, सगळं उरकण्याच्या आत पोहोचले."

तेव्हा सोनाली लग्नाला पोहोचू शकली नाही तरीही गोंधळ विधीसाठी ती धावत पळत पोहोचली असल्याचं म्हणतेय. शिवाय हा विधी उरकण्याच्या आधी ती पोहोचली आणि नवविवाहीत जोडप्याला भेटली.

सिद्धार्थ - मितालीवर अजूनही शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळतय.

Recommended

Loading...
Share