पाहा Photos : 'टाईमपास' सिनेमातील अभिनेत्याचा हा लूक पाहुन येईल रणवीर सिंहची आठवण

By  
on  

अभिनेता रणवीर सिंहची फॅशन, त्याची स्टाईल आता सर्वश्रुत आहे. हटके कपडे आणि लुकमुळेही रणवील सिंह हा कायम चर्चेत असतो. इतरांपेक्षा त्याची स्टाईल वेगळी असल्याने स्पॉटलाईट कायम त्याच्यावर असल्याचं पाहायला मिळतं. रणवीरचे असे अनेक लुक चर्चेत राहिले आहेत. मात्र एका मराठी अभिनेत्याने नुकतच केलेलं फोटोशूट पाहुन तुम्हाला रणवीर सिंहची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 

अभिनेता प्रथमेश परबने नुकतच एक खास फोटोशूट केलय. या फोटोशूटमधील त्याचा पेहराव, लूक पाहून त्याची स्टाईल रणवीरसोबत कम्पेर केली जात आहे. प्रथमेशच्या या लूकला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. या फोटोंमध्ये रंगीबेरंगी आउठफीट, गॉगल आणि कलरफुल शूज घातलेला प्रथमेशचा लूक पाहायला मिळतोय.

याआधीही प्रथमेशचे एकापेक्षा एक आउटफीटमध्ये फोटोशूट पाहायला मिळालं आहे. मात्र या लुकने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

अभिनेता प्रथमेश परबने त्याच्या अभिनय कौशल्याने असंख्य प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'बालक पालक', 'टाईमपास', 'टाईमपास 2', 'दृश्यम' यासारख्या सिनेमांमधून प्रथमेशने प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकत्याच रिलीज झालेल्या डार्लिंग सिनेमातून प्रथमेश प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. याचवर्षी प्रथमेशचा 'ओह माय घोस्ट' हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे.

 

Recommended

Loading...
Share