'काय घडले त्या रात्री' ही मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे. या मालिकेत आता वकिल विश्वजित चंद्रा आणि एसीपी रेवती बोरकर समोरासमोर येणार आहेत. मात्र हा विश्वजित दुसरा तिसरा कुणीही नसून तो रेवतीचा पति आहे. अत्यंत श्रीमंत आणि नामवंत वकील म्हणून विश्वजितची समाजात ओळख आहे.
याच वकिल विश्वजित चंद्राच्या भूमिकेत दिसणार आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव. या मालिकेतून संजय जाधव त्यांच्या नवा प्रवासाला सुरुवात करत आहेत. या मालिकेतून त्यांनी टेलिव्हीजनवर अभिनेता म्हणून एन्ट्री करत आहेत. आत्तापर्यंत विविध सिनेमा, मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणारे संजय जाधव या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतील.
आपल्या समाजात अनेक लोक राहात असतात पण याच समाजात काही प्रतिष्टीत मंडळी अशी असतात त्यांच्या हालचालींवर प्रत्येकाचं लक्षं असतं. अशी एक सुप्रसिद्ध प्रतिष्टीत व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते तेव्हा एक गूढ रहस्य मागे सोडून जाते. पोलिसांच्या हाती लागलेले पुरावे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं स्पष्ट करतात आणि तपासाला एक नवं वळणं मिळतं. अशी या मालिकेची कथा आहे. तेव्हा एसीपी रेवती यामागचं गूढ शोधून काढेल का हे ? हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे.