By  
on  

पाहा Photos : मालदीवमध्ये शर्मिष्ठा राऊत अशी एन्जॉय करतेय हनीमून

यावर्षी अनेक मराठी सेलिब्रिटींचा लग्नाचा सिझन पाहायला मिळाला. मागील वर्षीही काही कलाकार लग्नबंधनात अडकले. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनेही मागील वर्षी लगीनगाठ बांधली. शर्मिष्ठा आणि तेजस देसाईने मागील वर्षी लग्न केलं. दोघांच्य लग्नाचे विविध कार्यक्रम चांगलेच चर्चेत आले.

कोरोनाग्रस्त परिस्थितीत दोघांनी हनीमून यावर्षी करायचं ठरवलं. सध्या दोघं मालदीव या सुंदर ठिकाणी हनीमूनची मजा लुटत आहेत. मालदीव या ठिकाणी अनेक कपल हनीमूनसाठी जातात. हे सुंदर ठिकाण कपल्ससाठी उत्तम ठिकाण असल्याने शर्मिष्ठा आणि तेजसने या ठिकाणची निवड केली. 

नुकतच दोघं मालदीवला पोहोचले असून या गोड कपल्सने त्यांच्या हनीमूनचे फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये या कपल्सचा रोमान्स पाहायला मिळतोय. मेड फॉर इच अदर असंमज दिसणार हे कपल मालदीवमध्ये मजा करताना दिसत आहेत. 

शर्मिष्ठाने अनेक मालिका आणि सिनेमांमधून काम केलं आहे. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्रीतून शर्मिष्ठाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive