By  
on  

पाहा Video : कुशल बद्रिके म्हणतो, "मित्रांना आपल्या कलेची कदर नसते"

'चला हवा येऊ द्या' चे विनोदवीर त्यांच्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमात येणारे पाहुणे आणि हा कार्यक्रम टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षकही या शोचे मोठे चाहते आहेत. अभिनेता कुशल बद्रिके, भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, डॉ. निलेश साबळे, भारत गणेशपुरे यांच्यासह या कार्यक्रमातील इतर विनोदवीर त्यांच्या कमाल कॉमेडी टायमिंगनेही प्रेक्षकांची मनं जिंकतात.

एवढच नाही तर सोशल मिडीयावरही हे कलाकार नेटकऱ्यांना हसवतात. या कार्यक्रमातील काही कलाकार सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. तेव्हा या सेटवरील, मेकअपरुममधील कॉमेडी व्हिडीओ ते पोस्ट करतात. नुकताच कुशल बद्रिकेने एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत कुशल गाणं गाताना दिसतोय. भाऊ कदमही या व्हिडीओत आहे. भाऊ कुशलच्या गायनाचं कौतुक करण्याऐवजी त्याला टोमणा मारताना दिसतोय. भाऊ आणि कुशलचा हा धमाल कॉमेडी व्हिडीओ सगळ्यांना आवडला आहे. 

 

कुशलने या व्हिडीओला दिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरतय. कुशल लिहीतो की, "साला मित्रांना कदर नसते आपल्या कलेची." असं विनोदी कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.भाऊ कदम आणि कुशल बद्रिके ही जोडी चला हवा येऊ द्याच्या मंचावर नेहमीच कमाल करते. आणि त्यांचे कॅमेऱ्यामागचे हे व्हिडीओही चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive