पाहा Photos : 'प्लॅनेट मराठी'च्या शुभारंभाला या सेलिब्रिटींनी लावली हजेरी

By  
on  

जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या आणि आपली मराठी कलाकृती, संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी 'प्लॅनेट मराठी' या पहिल्या वाहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली होती. नुकतच 'प्लॅनेट मराठी'च्या कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला.  


या सोहळ्याला सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते सचिन पिळगावकर, मृणाल कुलकर्णी, अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, संजय जाधव, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव, अजय - अतुल, प्राजक्ता माळी, श्रुती मराठे, सायली संजीव, गायत्री दातार, गौरव घाटणेकर, नेहा पेंडसे, मनवा नाईक, स्वप्ना वाघमारे- जोशी, सोनाली खरे, आदिनाथ कोठारे, सुव्रत जोशी, शिवानी बावकर, आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी, सुभाष देसाई, स्वप्नील गोडबोले, अमित फाळके या कलाकारांनी हजेरी लावली होती.

यावेळी अभिनेत्री सायली संजीवचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

 पुष्कर श्रोत्री आणि आदित्य ओक यांची भागीदारी असणाऱ्या या 'प्लॅनेट मराठी'चे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर आहेत.

आपल्या या संकल्पनेविषयी अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''देशातील तसेच परदेशातील मराठी प्रेक्षक 'मराठी चित्रपटांच्या 'फर्स्ट डे फर्स्ट शो'चा अनुभव घरबसल्या घेऊ शकतील. मराठी आशयाला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी 'प्लॅनेट मराठी'चा कायम प्रयत्न असेल. आज आमच्या या कुटुंबात अनेक दिग्गज आहेत, ज्यांच्यामुळे आमचे हे कुटुंब अधिक सक्षम होईल आणि त्यांच्या मदतीने आम्ही उत्कृष्ट असा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू.''

Recommended

Loading...
Share