By  
on  

क्रांती रेडकर लिहितीये नवा सिनेमा, सोशल मिडियाद्वारे दिली माहिती

उत्तम अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर.  विनोदी किंवा गंभीर अशा दोन्हीही भूमिका क्रांतीने उत्तम निभावल्या आहेत. ‘कोंबडी पळाली’ या गाण्याने क्रांतीला ओळख दिली. त्यानंतर ‘माझा नवरा तुझी बायको’,’मर्डर मेस्त्री’,’नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘ऑन ड्युटी 24 तास’, ‘ट्रकभर स्वप्नं’ या सिनेमांमधून क्रांतीच्या सर्वोत्तम अभिनयाची झलक सर्वांना पहायला मिळाली.  ‘काकण’ या हद्यस्पर्शी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळून तिने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. क्रांती आता नव्या सिनेमाच्या तयारीला लागली आहे.

https://www.instagram.com/tv/Bv6KhpMgHVj/?utm_source=ig_web_copy_link

सोशल मिडियात व्हिडियो अपलोड करत तिने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे क्रांती या सिनेमाच्या पटकथेचं लेखन स्वत: करणार आहे. गुढी पाडव्यादिवशी तिने हा व्हिडियो शेअर केला आहे. तिचा हा आगामी सिनेमा यावर्षाखेरीस किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला फ्लोअरवर जाईल. ही देखील काकण प्रमाणेच एक लव्ह स्टोरी असल्याचं तिने या व्हिडियोत सांगितलं आहे. क्रांतीच्या फॅन्सना तिच्या या आगामी सिनेमाविषयी उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive