By  
on  

'वादळवाट' मालिकेत एकत्र झळकले होते हे प्रसिद्ध कलाकार, शेयर केली आठवण

सध्या टेलिव्हीजन विश्वात अनेक मालिका पाहायला मिळतात. या मालिकांच्या गर्दीत प्रत्येक मालिका स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण करू पाहतेय. मात्र असं असलं तरी काही जुन्या मालिका अशा आहेत ज्यांचं स्थान कधी पुसलं जाणार नाही. अनेक नव्या मालिका येतील जातील पण या जुन्या मालिकांची गोडी आणि आठवणी काही वेगळ्याच आहेत. 

अभिनेता चिन्मय मांडलेकरने अशीच एक आठवण शेयर केली आहे. ही आठवण आहे वादळवाट या मालिकेची. या जुन्या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेत अनेक कलाकार आणि त्यांच्या विविध भूमिका पाहायला मिळाल्या होत्या. 

 

चिन्मय आणि अभिनेता सुबोध भावे यांचा हा एकत्र फोटो आहे. या मालिकेत त्यांनी जयसिंह आणि शेरा अशा भूमिका साकारल्या होत्या. त्याच भूमिकेची आठवण हा फोटो पाहुन येते. चिन्मय या पोस्टमध्ये लिहीतो की, "आणि पुरस्कार दिला जातोय या सर्वोत्कृष्ट कलपलला.. जयसिंह आणि शेरा. काय दिवस , काय वेळ."  

यासोबतच या मालिकेच्या आठवणी जागवणाऱ्या फॅन क्लबचे चिन्मयने आभार मानले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive