By  
on  

पाहा Video : अशाप्रकारे संपलं प्रिया बापटच्या आगामी वेबसिरीजचं शुटिंग

2019 मध्ये आलेल्या 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसिरीजची प्रचंड चर्चा झाली होती. या सिरीजमध्ये असलेल्या दमदार मराठमोळ्या स्टारकास्टने तर सगळ्यांंचचं लक्ष वेधलं होतं. शिवाय प्रिया बापटच्या एका सीनची चर्चा रंगली होती. प्रिया बापटचा समलैंगिक किसींग सीन व्हायरल झाला होता. याशिवाय या सीनला ट्रोल करणाऱ्यांनाही प्रियाने सडेतोड आणि योग्य उत्तर दिलं होतं. सिरीजच प्रदर्शित झाल्यानंतर प्रियाच्या कामाचंही कौतुक झालं. मात्र या सिरीजमध्ये पुढे काय घडणार याची अनेकांना उत्सुकता होती. त्यानंतर या सिरीजचा दुसरा सिझन येणार असल्याचीही घोषणा झाली.

प्रियाने नुकतच 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या दुसऱ्या सिझनचं शुटिंग पूर्ण केलं आहे. नुकतच या सिरीजचं शुटिंग पूर्ण करण्यात आलं असून शुटिंग संपलं आहे. प्रियाने सोशल मिडीयावर या शेवटच्या शेड्युलचा व्हिडीओ शेयर केला आहे. यात या सिरीजची टीम सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

376 दिवसांत या सिरीजचं चित्रीकरण करण्यात आलं. लवकरच ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजच्या पहिल्या सिझनचं दिग्दर्शन, लेखन करणारे नागेश कुकुनूर यांनीच दुसऱ्या सिझनचही दिग्दर्शन केलं आहे. राजकारण आणि नाती याभोवती फिरणारी या सिरीजच्या कहाणी आता दुसऱ्या सिझनमध्ये काय घेऊन येतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive