By  
on  

आस्ताद काळेने शेयर केला होणाऱ्या बायको सोबतचा हा थ्रोबॅक फोटो

सध्या मराठी मनोरंजन विश्वात लग्नसराई सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळतय. त्यातच अभिनेता आस्ताद काळेचही लग्न लवकरच पार पडणार आहे. आस्ताद आणि अभिनेत्री स्वप्नाली याच वर्षी लग्न करत असल्याची चर्चा रंगली होती. आता दोघांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. येत्या 14 फेब्रुवारी दोघं विवाहबंधनात अडकणार आहे. तेव्हा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आस्ताद आणि स्वप्नाली लगीनगाठ बांधणार आहेत.

अस्ताद आणि स्वप्नाली दोघं एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात आणि एकमेकांना डेट करत आहेत. आस्तादने नुकतेच स्वप्नालीसोबतचे थ्रोबॅक फोटो शेयर केले आहेत. यात आणखी एक फोटो त्याने पोस्ट केला आहे. या फोटोत दोघं वेगळ्या पेहरावात दिसत आहेत. एखाद्या नाटक्याच्या किंवा सेटवर कॉश्यूममध्ये काढलेला हा फोटो असल्याचं पाहायला मिळतय. 

आस्ताद या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीतो की, "हे स्पष्ट करण्यासाठी शब्द नाहीत."

 

आस्दात आणि स्वप्नाली हे मराठी मनोरंजन विश्वात कलाकार म्हणून काम करतात. आस्तादने अनेक मालिका, सिनेमे, नाटकात काम केलेलं आहे. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात आस्ताद स्पर्धक म्हणून दिसला होता. शिवाय सिंगींग स्टार या गायनाच्या रिएलिटी शोमध्येही आस्तादने सहभाग घेतला होता. 

Recommended

PeepingMoon Exclusive