अभिनेता आरोह वेलणकर सोशल मिडीयावरील पोस्टमध्ये चर्चेत असतो. आरोह हा सोशल मिडीयावर विविध विषयांवर मत मांडताना दिसतो. आरोहने नुकताच एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओतून तो त्याची झोप उडाल्याचं कारण सांगतोय.
आरोह वेलणकरची सध्या झोप उडाली आहे. याचं कारण म्हणजे आरोह मुंबईत राहत असलेल्या बिल्डिंगमागे असलेल्या मशिदीमधून जोरजोरात होणाऱ्या अजानमुळे त्याची सध्या झोप उडाली आहे.म्हणूनच आरोहने ही अजान सुरु असताना बुधवारी पहाटे हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत पहाटे सहा वाजताची अजान सुरु असताना कशी झोप मोडली असल्याचं आरोह या व्हिडीओत सांगतोय. याआधीही आरोहने याविषयी सोशल मिडीयावर पोस्ट केली होती. मात्र याने त्रस्त झालेल्या आरोहने अखेर झोप मोडल्यानंतर "काय करायचं ह्याचं!??" म्हणत थेट व्हिडीओच पोस्ट केला आहे.
काय करायचं ह्याचं!??! @CPMumbaiPolice @mybmc @AUThackeray @OfficeofUT @AnilDeshmukhNCP @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks सांगा!! पोलीसांना सांगून पण काही होत नाही.. A 2018 Mumbai High Court Judgement has termed this loudspeakers illegal and that they must be removed. pic.twitter.com/OA0uQkQhA7
— Aroh Welankar (@ArohWelankar) February 17, 2021
आरोहच्या घरामागे असलेल्या पठाणवाडी भागातील मशिदीमधून जोरजोरात येणाऱ्या आवाजामुळे झोपेच्या वेळी प्रचंड गैरसोय होत असल्याचं आरोह सांगतो. पोलिसांना सांगूनतही काही होत नसल्याचं आरोह या पोस्टमध्ये सांगतो.
2017 मध्ये गायक सोनू निगमनेही अजानमुळे होत असलेली गैरसोय सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केली होती. त्यानंतर खूप मोठा वादही झाला होता.