By  
on  

पाहा Video : या नव्या टायटल साँगमध्ये अशी थिरकली मिताली मयेकर

'हॅशटॅग प्रेम' हा प्रेमकथेवर आधारित सिनेमाचं शीर्षक गीत नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे.  निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी माऊली फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली या आजच्या युगातील प्रेमकथेची निर्मिती केली असून दिग्दर्शक राजेश बाळकृष्ण जाधव यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. “दोस्तीवाली फ्रेम, हॅशटॅग प्रेम...’’ अशी मनमोहक शब्दरचना असलेलं ‘हॅशटॅग प्रेम’मधील हे टायटल साँग आहे. गीतकार कौतुक शिरोडकर यांच्या लेखणीतून अवतरलेलं टायटल साँग संगीतकार प्रविण कुवर यांनी रूपाली मोघे यांच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. आशिष पाटील यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.  

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या टायटल साँगमध्ये मिताली मयेकरचा डान्स पाहायला मिळतोय. हे गाणं मितालीवर चित्रीत करण्यात आलं असून मितालीच्या डान्सची अदा यात पाहायला मिळतेय.

मिताली मयेकर आणि सुयश टिळक ही नवी कोरी जोडी या सिनेमाच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरणारी आहे. गायक-संगीतकार रोहित राऊतने या सिनेमाला पार्श्वसंगीत देत संगीत विभागाची बाजू सांभाळली आहे. कथा-पटकथा निखिल कटारे यांनी लिहिली असून, कार्यकारी निर्माते महेश भारंबे आहेत. सिनेमॅटोग्राफर राजा फडतरे यांची सिनेमॅटोग्राफी तर केशव ठाकूर यांचं कला दिग्दर्शन प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल. ‘हॅशटॅग प्रेम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive