या मराठी सिनेमाचं चित्रीकरण झालं पूर्ण , आता प्रदर्शनाची उत्सुकता

By  
on  

लेखक विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाची घोषणा करताना सिनेमाचा फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. या पोस्टरवर लाल रंगाच्या ओढणीने चेहरा झाकलेली स्त्री पाहायला मिळाली. ही अभिनेत्री नेमकी कोण याचीच सगळ्यांना उत्सुकता होती. त्यातच तोही खुलासा झाला. अभिनेत्री अमृता खानविलकर या सिनेमात झळकणार असल्याचं समोर आलं. प्रसाद ओक दिग्दर्शित या सिनेमाचं चित्रीकरण सध्या सुरु होतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Oak (@oakprasad)

 

नुकतच या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलय. प्रसाद ओक यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. याशिवाय यावेळी संपूर्ण टीमने मिळून या शेवटच्या दिवसाचं सेलिब्रेशन केलं. 

तेव्हा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतोय याची उत्सुकता अनेकांना असेल. 

Recommended

Loading...
Share