अभिनेता ऋषी सक्सेनाच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र या शुभेच्छांमध्ये एक खास शुभेच्छा त्याला मिळाली आहे. या शुभेच्छा त्याला मिळाल्या आहेत त्याच्या गर्लफ्रेंडकडून. ऋषीची गर्लफ्रेंड ईशाने त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
ईशाने सोशल मिडीयावर ऋषीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेयर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ईशा या पोस्टमध्ये लिहीते की, "तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा फक्त माझा बॉयफ्रेंड नाही तर माझा बेस्ट फ्रेंड आहेस. तू एक दयाळू आणि सगळ्यात गोड माणूस आहेस. मागील काही वर्षे तुझ्यामुळेच त्यातून जाऊ शकले. माझं तुझ्यावर प्रेम आहे."
असा खास मेसेजही ईशाने पोस्टमध्ये लिहीला आहे. ईशा आणि ऋषीची जोडी मराठी मनोरंजन विश्वातील सगळ्यात गोड जोडींपैकी एक आहे. सोशल मिडीयावरही दोघांचे गोड फोटो चर्चेत असतात. अद्याप दोघांच्या लग्नाविषयी कोणतीच बातमी समोर आली नसली तरी दोघं अनेक वर्षांपासून डेट करत आहेत.