By  
on  

पाहा Video : गश्मीर महाजनीने सेटवर अशी केली मारामारी, म्हणतो खूप काळाने केली ही गोष्ट

मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारांचं काहीना काही स्वप्न असतं. विविध मालिका, सिनेमे, नाटक करत असताना आपली आवडती गोष्ट करायला मिळाली की कलाकाराला आणखी मजा येते. अभिनेता गश्मीर महाजनीच्या बाबतीतही असचं झालय. 'इमली' या मालिकेच्या निमित्ताने त्याने त्याची आवडती गोष्ट केली आहे.

गश्मीरने नुकताच एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत गश्मीर फाईट सिक्वेन्स करताना दिसतोय. बऱ्याच दिवसांनी फाईट सीन करण्याचा आनंद गश्मीरने या पोस्टमध्ये शेयर केला आहे. गश्मीरला एक्शन, फाईट सीन्स करायला प्रचंड आवडतं. आणि म्हणूनच बऱ्याच दिवसांनी फाईट सीन करून त्याला आनंद झालाय. या पोस्टमध्ये गश्मीर लिहीतो की, "इमलीच्या सेटवर मार खाताना, खूप काळाने मला जे सगळ्यात जास्त आवडतं ते करतोय." 

 

गश्मीरला अभिनयासह नृत्याचीही प्रचंड आवड आहे. त्याची डान्स अकॅडमी सुद्धा आहे. आणि आता त्याच एक्शनविषयीचं प्रेमही पाहायला मिळतय. गश्मीरने आत्तापर्यंत विविध मराठी सिनेमांमध्ये काम केलय. 'श्रीकांत बशी'र या वेबसिरीजमधून गश्मीरने ओटीटी विश्वातही पाऊल ठेवलं. आता गश्मीर इमली या हिंदी मालिकेत झळकतोय. प्रसिद्ध अभिनेते रविंद्र महाजनी यांचा गश्मीर मुलगा असला तरी त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख या मनोरंजन विश्वात निर्माण केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive