पाहा Video : या अभिनेत्रींनी एकत्र येऊन असं केलं महिला दिनाचं सेलिब्रेशन

By  
on  

महिला दिन काही दिवसांवरच आहे. यातच अनेक ठिकाणी महिला दिन विशेष कार्यक्रम पार पडत आहेत. तर काही ठिकाणी विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येतोय. यातच प्लॅनेट मराठीने देखील महिलांचा सन्मान करण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रम केला आहे. यावेळी केक कापून आणि गुलाबाचं फुल देऊन काही अभिनेत्रींना सन्मानित करुन महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्लॅनेट मराठीचे फाउंडर अक्षय बर्दापुरकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री, दिग्दर्शक संजय जाधवही उपस्थित होते. 

 

अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, प्राजक्ता माळी, गायत्री दातार, भार्गवी चिरमुले या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. यावेळी या अभिनेत्रींनी केक कापून महिला दिन साजरा केला. याशिवाय समाजात असलेलं महिलांचं स्थान, महिलांनी महिलांना सहकार्य करण, या आणि अशा इतर मुद्द्यावर या अभिनेत्रींनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

Recommended

Loading...
Share