By  
on  

जॉन अब्राहमच्या उपस्थितीत उलगडला ‘सविता दामोदर परांजपे’चा ट्रेलर

अभिनेता जॉन अब्राहमचं मराठी कनेक्शन तुम्हाला माहित असेलच. ‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकावर आधारित मराठी सिनेमाची निर्मिती जॉन करत आहे. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहऴा नुकताच सिनेमातील कलाकार आणि अभिनेता जॉन अब्राहमच्या उपस्थितीत शानदार पध्दतीने पार पडला. जॉनने पहिल्यांदाच मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे

https://www.youtube.com/watch?v=a3JTqtVIBT0

‘जे. ए. एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ची प्रस्तुती असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ चा निर्माता म्हणून जॉन खुप उत्सुक आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहता सस्पेन्स, थ्रीलर आणि गूढ अशा कथानकावर बेतला आहे. फार महत्त्वपूर्ण आणि वेगळा विषय या सिनेमाद्वारे हाताळल्याचे ट्रेलरमधून समोर येत आहे.

‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकावर आधारित सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी करत आहेत. गुणी अभिनेता सुबोध भावे प्रमुख भूमिकेत असून ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या तृप्ती तोरडमल या सिनेमाद्वारे पदार्पण करत आहे. तसंच अभिनेता राकेश बापटसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसेल. शिरीष लाटकर यांनी या सिनेमाचं लेखन केलं असून निलेश मोहरीर आणि अमित राज यांनी संगीत दिले आहे.

या सिनेमातील ‘सविता’ या महत्वपूर्ण व्यक्तिरेखेद्वारे तृप्ती तोरडमल प्रेक्षकांसमोर येत आहे. यापूर्वी, एका प्रसिध्द नाटकाद्वारे दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांनी ही भूमिका साकरली होती. त्यामुळे, सिनेमात सविता साकारण्याचे मोठे आव्हान पदार्पणातच तृप्तीवर आहे.

सर्वांनाच जॉन अब्राहमच्या ‘सविता दामोदर परांजपे’ या पहिल्या-वहिल्या मराठी सिनेमाची प्रेक्षक आणि संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीलासुध्दा भरपूर उत्सुकता आहे. येत्या 31 ऑगस्टला ‘सविता दामोदर परांजपे’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive