By  
on  

"आपण फक्त आपल्या वाट्याचं आभाळ शोधावं" म्हणत कुशल बद्रिकेने शेयर केला हा फोटो

सोशल मिडीयावर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सक्रिय आहेत. विविध फोटो, व्हिडीओ शेयर करताना हे कलाकार दिसतात. अनेकदा आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी कलाकार सोशल मिडीया हे माध्यम निवडतात. तर कधी आपले विचार या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर मांडतात. अभिनेता कुशल बद्रिकेही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. 

 

'चला हवा येऊ द्या' फेम कुशलने नुकतीच सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कुशल निसर्गरम्य उंच ठिकाणी पर्वत रांगाच्या समोर उभा असलेला दिसतोय. मात्र फोटोपेक्षा या पोस्टचं कॅप्शन लक्षवेधी ठरतय. कुशल लिहीतो की, "आपण फक्त आपल्या वाट्याचं आभाळ शोधावं, किंवा वाटेत लागेल ते आभाळ आपल म्हणत जावं.माणसांच्या बाबतीतंही हाच नियम लागू होतो. बाकी मनामनांच्या भेटी क्षितीजासारख्या आहेत, आहेही आणी नाहीही..."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive