प्रिया बापटने शेयर केला उमेश कामतसोबतचा असा फोटो, चाहत्यांनी केला लाईक्सचा वर्षाव

By  
on  

अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. ऑनस्क्रिन किंवा ऑफस्क्रिनही ही जोडी पसंत केली जाते. सोशल मिडीयावर हे दोघही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. या कपलचे फोटो मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. प्रियाने नुकताच एक असा फोटो शेयर केलाय जो चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. 

प्रियाने उमेश कामतसोबतचा एक रोमँटिक फोटो शेयर केला आहे. ज्यावर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. या फोटोला हजारो लाईक्स मिळाले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये प्रिया उमेशला पीनट बटर म्हणतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

या कपलचे अनेक गोड फोटो सोशल मिडीयावर कायम चर्चेत असतात. 2011 मध्ये दोघांनी लगीनगाठ बांधली होती. टाईम प्लीज या सिनेमात दोघं एकत्र झळकले होते. आणि बरच काही या वेबसिरीजमध्ये दोघं कपलच्या भूमिकेत दिसले होते. या वेबसिरीजला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. त्यानंतर या वेबसिरीजचं दुसरं सिझनही पसंत केलं गेलं. 

Recommended

Loading...
Share