By  
on  

पाहा Photos : या लुकमध्ये दिसली 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडे

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील विनोदवीरांचे अनेक चाहते आहेत. भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, डॉ. निलेश साबळे यासह इतर कलाकार अशी ही संपूर्ण टीम महाराष्ट्राची लाडकी बनली आहे. हे कलाकार या कार्यक्रमातून प्रेक्षकांना भरपुर हसवतात. या कलाकारांमध्ये आपल्या हटके अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधते ती म्हणजे अभिनेत्री श्रेया बुगडे. विविध कलाकारांच्या नकला करणे किंवा मंचावर एकापेक्षा एक विविध पात्र साकारून श्रेया सगळ्यांचं मनोरंजन करत असते.

सोशल मिडीयावरही श्रेया मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. श्रेयाचे विविध फोटो आणि व्हिडीओही सोशल मिडीयावर पाहायला मिळतात.

श्रेयाने तिचे काही फोटो नुकतेच सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. नुकत्याच केलेल्या फोटोशुटचे हे फोटो आहेत. शर्ट, जॅकेट, जीन्स असा हा श्रेयाचा डॅशिंग लुक यात पाहायला मिळतोय.श्रेयाचे हे फोटो चाहत्यांनाही प्रचंड आवडले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive