By  
on  

पाहा Video : या नव्या गाण्याच्या निमित्ताने एकत्र झळकले मानसी-प्रदीप हे नवविवाहीत जोडपं

यावर्षाची सुरुवात अभिनेत्री मानसी नाईकसाठी खास होती. कारण याचवर्षी मानसीने प्रियकर प्रदीप खरेरासोबत लगीनगाठ बांधली. वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी महिन्यात मानसी आणि प्रदीपचा लग्नसोहळा पार पडला. जेव्हापासून या कपलने डेट करत असल्याची घोषणा केली आहे तेव्हापासून हे गोड कपल चर्चेत आहेत. लग्नानंतरही हे कपल सोशल मिडीयावर चर्चेत आहेत. मानसी आणि प्रदीपचे फोटो आणि व्हिडीओ याआधीही व्हायरल होताना दिसले. लग्नानंतरही ही जोडी पुन्हा एकदा एका खास करण्यासाठी चर्चेत आली आहे.

नुकतच हे कपल एका गाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र झळकले आहेत. वाटेवरी मोगरा या नव्या गाण्यात मानसी आणि प्रदीप झळकत आहेत. नुकतच हे गाणं प्रदर्शित करण्यात आलय. या गाण्यात मानसी आणि प्रदीपचा रोमान्स पाहायला मिळतोय. 

 

या गाण्यात दोघांची जोडी प्रचंड पसंत केली जात आहे. या मराठी गाण्यावर प्रदीपनेही उत्तम लिपसिंग केलेलं पाहायला मिळतय. तेव्हा ही जोडी आगामी काळातही पुन्हा एकत्र झळकली तर त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असेल एवढं नक्की. सागरीका म्युझीकसाठी मानसी आणि प्रदीपने हा खास व्हिडीओ केला आहे. गायिका वैशाली सामंत आणि गायक स्वप्निल बांदोडकर यांनी हे गाणं गायलं असून श्रीपाद अरुण जोशी यांचे गीत आहे. निलेश मोहरीरने हे गाणं कम्पोज केलं आहे.

 मागील वर्षी मानसी नाईकने ती प्रेमात असल्याचं सांगत प्रदीपसोबतच्या नात्याचा खुलासा सोशल मिडीयावर केला होता. त्यानंतर मागील वर्षी दोघांनी साखरपुडाही केला. लग्नानंतर दोघांच्या नात्याच्या सुरुवातीलाच या गाण्याने खास गोष्ट घडली असल्याचं पाहायला मिळतय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive