सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या जातात. अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिज्ञाला चाहत्यांनीही सोशल मिडीयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय अनेक कलाकारांनीही अभिज्ञाला सोशल मिडीयावर विश केलं आहे.
यात अभिज्ञाला एका खास व्यक्तिकडूनही वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे अभिज्ञाची खास मैत्रीण श्रेया बुगडे. सोशल मिडीयावर अभिज्ञा आणि श्रेयाचे अनेक फोटोही याआधी पाहायला मिळाले आहेत.
अभिज्ञाच्या वाढदिवसाला श्रेयाने सोशल मिडीयावर दोघांचा एक खास फोटो शेयर केला आहे. "वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी वेडी" असं म्हणत श्रेयाने खास मैत्रीण अभिज्ञाला शुभेच्छा दिल्या.