नवविवाहीत जोडपं मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा लग्नानंतरही विविध गोष्टींसाठी चर्चेत आहेत. लग्नानंतर दोघं पहिल्यांदाच एका गाण्यात एकत्र झळकले. वाटेवरी मोगरा हे त्यांचं नवं रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
मानसीने नुकतेच या गाण्याच्या सेटवरील काही फोटो शेयर केले आहेत.
या फोटोंमध्ये दोघांची रोमँटिक जोडी पाहायला मिळत आहेत. मानसी आणि प्रदीपच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते. आता त्यानंतर हे गाणंही चर्चेत आलं आहे.
याचवर्षी दोघांनी जानेवारी महिन्यात लगीनगाठ बांधली असून मागील वर्षी मानसीने प्रदीपसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता.