पाहा Video : झाडावर अशी पटापट चढली 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील ही अभिनेत्री

By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी निमकर सोशल मिडीयावर चर्चेत असते. सोशल मिडीयावर माधवीचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी माधवी विविध पोस्ट शेयर करत असते. नुकताच माधवीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे जो चांगलाच चर्चेत.

या व्हिडीओत माधवी चक्क झाडावर चढताना पाहायला मिळत आहे. नारळाच्या झाडावर माधवी पटापट चढताना दिसत आहे. चाहत्यांनाही माधवीचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.

 

या पोस्टमध्ये माधवीने लिहीते की, "तुम्ही थोडे वेडे आहात हे माहित असण्यात आनंद आहे." या झाडासोबतचे फोटोही माधवीने शेयर केले आहेत. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत शालिनी वहिनीची भूमिका साकारणाऱ्या माधवीला प्रेक्षकांनी पसंत केलं. सोशल मिडीयावर माधवी मालिकेच्या सेटवरीलही काही व्हिडीओ शेयर करत असते. फिटनेससाठी माधवी योगा करते. त्यामुळे तिचे योगा व्हिडीओ आणि फोटोही पसंत केले जातात.

Recommended

Loading...
Share