नाटक, मालक आणि सिनेमे अशा विविध क्षेत्रात आपल्या अभिनयाने आणि अफाट ऊर्जेने काम करणारे अभिनेते भरत जाधव सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतय. इन्स्टाग्रामवरील अकाउंटवर भरत जाधव विविध पोस्ट करताना दिसतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टवर मात्र त्यांच्या चाहत्यांचं लक्ष असतं. भरत यांनी नुकतीच एक महत्त्वाची पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ते अभिनयाविषयी सांगत आहेत.
ते लिहीतात की, "रंगभूमीवर करा किंवा कॅमेरा समोर करा अभिनय हा अभिनय असतो. पण काही गोष्ठींच भान असणं आवश्यक आहे. रंगभूमीवर काम करत असताना तुम्हाला शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षका पर्यंत पोहोचायच असत... त्यासाठी देहबोलीच - आवाजाचं एक वेगळ वर्किंग असत. तर याउलट Camera समोर काम करताना तुमचे अतिशय सूक्ष्म हावभाव सुद्धा टिपले जातात, त्यामुळे काही Technical गोष्टी खुप जपाव्या लागतात."
त्यामुळे अभिनयाविषयीचे हे बारकावे भरत जाधव यांनी या पोस्टमध्ये मांडले आहे. या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांसाठी हा संदेश मोलाचा ठरेल एवढं नक्की. दांडगा अनुभव असणाऱ्या या अभिनेत्याकडून अभिनयाविषयीच्या या गोष्टी पोस्टच्या स्वरुपात पाहुन अभिनयात करियर करु पाहणारे सुखावले असतील यात शंका नाही.
सध्या भरत जाधव हे केदार शिंदे यांच्या 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेत झळकत आहेत.