पुणे सायबर पोलिसांनी नुकतीच मोठी कारवाई केली आहे. भारतीयांचे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये यातून वाचवण्यात आले आहे. बँकांच्या खातेदारांची गोपनीय माहिती, डेटा चोरून विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे. यात अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणीचाही समावेश आहे.
या मोठ्या कारवाईत डेटा खरेदीवेळी 25 लाख रुपये घेताना 10 जणांना अटक करण्यात आली आहे. भाजपच्या चित्रपट आघाडीचे शहराध्यक्ष आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणीसह दहा जणांच्या आंतररराज्य टोळीला यावेळी अटक करण्यात आली. यात अनेक मोठ्या व्यक्तींचाही सहभाग असल्याचं कळतय. मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणारे एक उत्तम अभिनेता म्हणून रवींद्र मंकणी यांची ओळख आहे.
या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी 25 लाख रुपये स्वीकारताना 10 जणांना अटक केली असून अन्य काही जणांची चौघांची सध्या चौकशी सुरु आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी चौघे जण नामांकित कंपन्यांमध्ये संगणक अभियंते म्हणून कार्यरत आहेत. रोहन हा रवींद्र मंकणी यांचा मुलगा असून तो भाजपच्या चित्रपट आघाडीचा पुणे शहराध्यक्ष आहे. याशिवाय तोही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. 37 वर्षी रोहन मंकणी हा पुण्यातील सहकारनगर भागात वास्तव्यास आहे.