दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेचा वेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आलेला मराठी चित्रपट 'द डिसाइपल' आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. विविध फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार मिळालेला हा चित्रपट आता ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
या चित्रपटाला 45 व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एम्प्लिफाय वॉयस अवॉर्ड हा प्रतिष्टेचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर बरीच घौडतौड केली. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. येत्या 30 एप्रिल 2021 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. संगीत क्षेत्रातील गुरु-शिष्य परंपरा आणि नात्यावर आधारित हा चित्रपट आहे. अभिनेता आदित्य मोडक या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चैतन्य ताम्हाणेने या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
चैतन्य ताम्हाणेच्या 'कोर्ट' या चित्रपटावरही पुरस्कारांचा वर्षाव झाला होता. भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत निवड झालेला हा मराठी चित्रपट होता.