By  
on  

उमेश - प्रियाने कोरोनाशी केले दोन हात, बरे झाल्यानंतर लाईव्ह व्हिडीओतून चाहत्यांशी संवाद

सध्या देशात कोरोनाचा फैलाव वाढताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे, यातच मनोरंजन विश्वातील कलाकारही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाली होती. सोशल मिडीयाच्या माध्यमातून या दोघांनी याविषयीची माहिती दिली होती. दोघांची कोविड चाचणी पॉजिटिव आल्यानंतर दोघं घरातच क्वारंटाईन होते. 

नुकतच उमेश- प्रियाचं क्वारंटाईन कालावधी संपला असून ते कोरोनातून बरे झाले आहेत. यासाठी दोघांनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह संवाद साधला. यावेळी चाहत्यांची संवात साधताना त्यांनी शुभेच्छांसाठी सगळ्यांचे आभार मानले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

या लाईव्ह व्हिडीओत चाहत्यांनी दोघांना विविध प्रश्न विचारले आहे.  'आणि काय हवं ?' या वेबसिरीजचं तिसरं पर्व कधी येणार याविषयी विचारलं गेलं. तेव्हा लवकरच सिरीजचं उरलेलं चित्रीकरण पूर्ण करणार असल्याचं उमेशने सांगीतलं असून ही सिरीज लवकरच भेटीला येणार असल्याचं तो म्हटला. प्रिया - उमेशने यावेळी या विषाणूपासून बचाव करण्यासाठी त्यांनी कोणती काळजी घेतली, इतरांनीही कोणती काळजी घ्यायला हवी हे देखील सांगीतलं आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर लवकरच योग्य ती काळजी घेऊन दोघं कामाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी सांगीतलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive